Deenanath Mangeshkar Hospital Pune PC | डिपॉझिट आम्ही मागत नाही पण आमचे ग्रह फिरले म्हणून...
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (Hospital) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणा रोष व्यक्त होताना दिसत आहे. दरम्या, या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा (Dr. Sushruta Ghaisas resigns) दिला आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली आहे. दरम्यान, त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाखांची डिपॉझिट मागितले होते, अशी कबुली मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ. केळकर यांनी दिली आहे. आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांची डिपॉझिट मागितल्याचेही केळकर म्हणाले.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची व्याप्ती व गंभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ हा राजीनामा एक्सेप्ट करेल असे केळकर म्हणाले. दरम्यान, मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. मी दडपणाखाली वावरत आहे. तसेच समाजमाध्यमांवर माझ्यावर कठोर टीका देखील होत आहे. यामुळं तणावाचे वातावरँण तयार झाले आहे. त्यामुळं डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यामध्ये कुटेही रुग्णालयाची बदनामी नको म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे घैसास यांनी सांगितल्याचे केळकर म्हणाले.